नासिक शहरांतील काही समविचारी महिलांनी एकत्र येवुन सन १९७५ मध्ये नवहितगुज महिला ग्रुप या नावाने समाजसेवेचे कार्य सुरू केले, त्यांत महिला एकत्रीकरण , महिला संघटीकरण, महिला सक्षमीकरण चे कार्य छोट्या मोठ्या प्रमाणात सुरू केले.. हळु हळु ह्या कार्यात महिला जोडल्या जावु लागल्या व कार्य वाढत गेले.. नंतर याचे नाव नवहितगुज महिला मंडळ असे झाले.. हे सेवाकार्य करतांना कोणतीही शासकीय नोंदणी केलेली नव्हती, किंबहुना तसा विचार मांडत होते परंतु त्याला प्रत्यक्ष स्वरुप येत नव्हते.
सन २०२५ म्हणजे ह्या सेवाकार्याचे ५० वे वर्ष, व आता आपल्या मंडळाचे स्वरुप मोठे करायला पाहिजे हा हेतु ठेवुन नुतन अध्यक्षा सौ संध्या राजेश कोठावदे व कार्यकारीणीने धर्मादाय आयुक्त नासिक यांचे कार्यालयात मंडळाची नोदंणी करण्याचा निर्णय घेतला व त्यापद्धतीने अर्ज पुर्तता केली व मार्च २०२५ मध्ये मंडळास धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून “लाडशाखीय वाणी समाज नवहितगुज महिला मंडळ नासिक” नावाने मान्यता मिळाली. नासिक मध्ये २-३ हजार महिलांमध्ये याबाबत चर्चा व्हायला सुरूवात झाली व त्यातील बऱ्याच महिलांनी मंडळाचे सभासदत्व स्विकारायला सुरूवांत केली.
मंडळाचा मुख्य उद्देश
समाजातील गरजु निराधार, विधवा, परितक्त्या महिलांना स्वावलंबनासाठी स्वताच्या पायावर उभे करणे, त्यासाठी अशा महिलांशी संपर्क साधून त्यांची कौटुंबिक माहिती जाणून घ्यायची, ते स्वालंबनाकरीता छोटा-मोठा व्यवसाय करु शकतात का, याची चाचपणी करायची, त्यांची शैक्षणिक माहिती, आवड, छंद जाणून घ्यायची. व त्यांना तुम्ही स्वताच्या पायावर उभे राहु शकतात, असा आत्मविश्वास द्यायचा. त्यानंतर त्यांना शिलाई मशीन, फॅालपिको मशीन चालविता येते का, ती माहिती घ्यायची, येत नसल्यास, त्यांना हे मशीन चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहीत करावयाचे, प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर अथवा अगोदरच येत असल्यास शिलाई मशीन द्यावयाचे व त्यांना रोजचे दैंनदिन उत्पन्न सुरू करुन स्वावलंबी बनवायचे, काही महिलांना आवड पाहुन नर्सिंग कोर्स करण्यास प्रोत्साहीत करायचे व कोणत्याही हॅास्पीटल मध्ये नर्स/सिस्टर म्हणुन नौकरी करण्यासाठी प्रोत्साहीत करावयाचे, काही महिलांना रहिवास क्षेत्र पाहुन घरगुती धान्य दळण व्यवसाय करण्यासाठी घरघंटी देवुन स्वावलंबी बनवायचे.. अशा प्रकारे समाजातील गरजु, निराधार, विधवा, परितक्त्या महिलांना स्वावलंबी बनविण्याचा मुख्य उद्देश ठेवुन नवहितगुज महिला मंडळ कार्य करत आहे.