संस्थेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. त्यातील काही उपक्रम खालीलप्रमाणे आहेत.
एका कळवण येथील महिलेस दोन लहान मुले असुन सहा महिन्यापूर्वी तिच्या पतीचे अपघाती दुःखद निधन झाले, ती आता मुलांना मखमलाबाद नासिक येथे रहावयास आलेली आहे, तिला आपण तिन महिन्यापूर्वी शिलाई मशीन दिले व आज ती स्वताच्या पायावर मुलांचे शिक्षण व उदरनिर्वाह करीत आहे. लवकरच ती स्वपैशातुन दुसरे शिलाई मशीन घेवुन अजुन एका महिलेस सोबत घेवुन व्यवसाय वाढविणार असल्याचे समजले आहे
एक कुटूंब कोपरगांव येथील असुन तीच्या पतीचा काम करीत असलेल्या नौकरीच्या ठिकाणी अपघात झाल्यामुळे कंबरेचे ॲापरेशन झाले असुन ते शारीरीक व्यधीमुळे आता नौकरी करण्याच्या परीस्थीतीत नाही. मंडळापर्यंत ही माहिती समजल्यावर आपण त्यांचेशी संवाद साधला, त्यांना शिलाई मशीन चालवता येते आहे, ही खात्री झाल्यावर एक शिलाई मशीन सुपूर्द करुन त्यां कुटुंबाला स्वावलंबी बनविण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
एक कुटूंब सातपुर येथील असुन पती कोरीअरचे काम करतात, घरांत वृद्ध आई-वडील, पैसे पुरत नाहीत, म्हणुन त्या महिलेने जोड व्यवसाय म्हणुन फॅालपिको मशिनची विनंती केली, आपण सदर मशीन त्वरित उपलब्ध करुन दिले व आज जोडव्यवसायास सुरूवात करुन पतीला हातभार लावत आहे.
सिडकोतील महालेफार्म येथील एक महिला पती निधना नंतर सासु-सासरे व मुले यांचा सांभाळ करीत आहे, तीला सुद्धा मंडळाने फॅालपिको चे मशीन देवुन उत्पन्न वाढीसाठी हातभार लावलेला आहे.
अशा अनेक गरजु महिला समाजात वावरत असुन त्यांना शोधुन, माहिती घेवुन त्यांना स्वावलंबी बनविण्याचे कार्य नवहितगुज महिला मंडळ करीत आहे.